Collector office Bharti 2023: जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांसाठी भरती सुरू: लवकर अर्ज करा

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Collector office Bharti 2023

collector office bharti 2023 -:  नमस्कार मित्रांनो तुमची जर सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तरी ही जाहिरात तुमच्यासाठी आहे. मुंबई जिल्हा शहर जिल्हाधिकारी यांचे करिता महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2019 नुसार कंत्राटी पद्धतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हे पद भरण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम या नावाचा उपक्रम जिल्ह्यात राबवायचा आहे त्यासाठी मुंबई शहर जिल्हा यांच्या कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी 27 डिसेंबर 2023 पूर्वी खाली दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे. अर्ज 27 डिसेंबर 2023 पर्यंत स्वीकारला जाईल त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता-: जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर जिल्हा,जुने जकात घर, भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई 400-001 

या भरतीसाठी अर्जाची पद्धत ही ऑफलाइनच राहील ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.

सदर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन या पदाची भरती 11 महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे या पदाचे नाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असे आहे.

Collector office Bharti 2023 Educational Criteria

या पदासाठी पात्रता -: 

उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले असावी तसेच आपत्ती व्यवस्थापनातील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना जास्त प्राधान्य दिले जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

तसेच उमेदवाराला मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबईच राहील

या पदाची भरती ही पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे त्यामुळे हे पद पूर्णपणे शासकीय म्हणून गणले जाणार नाही. याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

या पदाची नेमणूक फक्त 11 महिन्यांसाठी करण्यात येणार आहे याची सुद्धा नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक हा 27 डिसेंबर 2023 पर्यंतच राहील. याची नोंद पात्र उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज सादर करावा.

Collector office bharti 2023 Important Links

अधिकृत जाहिरातइथे क्लिक करा 
अर्जाचा नमूनाइथे क्लिक करा 
WhatsApp ग्रुप जॉइन कराइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉइन करा.इथे क्लिक करा

 

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!